मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत जळगावातील रस्त्यांसाठी २०० कोटी रूपयांचा निधी मिळण्याचा निर्णय झाला असून यातून रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.
ना. गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने आज जळगावातील रस्त्यांच्या प्रश्नावर मुंबईत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. संजय सावकारे उपस्थित होते.
या बैठकीत जळगावातील रस्त्यांसाठी २०० कोटी रूपये मिळावे अशी मागणी ना. गिरीश महाजन यांनी केली. याला या बैठकीत मान्यता मिळाली असून येत्या सहा महिन्यांमध्ये हा निधी मिळणार असल्याची माहिती ना. गिरीश महाजन यांनी दिली आहे.