जळगाव प्रतिनिधी । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर काल रविवारी रात्री गोळीबार करणार्या चारजणांपैकी दोन संशयितांना आज दुपारी रामानंदनगर पोलीसांनी जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
उमेश पांडूरंग राजपूत आणि किरण शरद राजपूत रा. पिंप्राळा जळगाव यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत वृत्त असे की, काल रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर इनोव्हातून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला. यात सुदैवाने त्यांना काही झाले नसले तरी यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. कुलभूषण पाटील यांनी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यानुसार रात्री उशीरा कुलभूषण वीरभान पाटील यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार महेंद्र राजपुत; उमेश राजपुत; मंगल राजपुत आणि बिर्हाडे ( पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. पिंप्राळा परिसर यांच्या विरूध्द या अनुषंगाने भादंवि कलम-३०७, ३४१, ५०४, ५०६, ५०७ तसेच शस्त्र अधिनियमातील कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, काल रात्रीपासूनच पोलिसांनी या चारही संशयितांच्या तपासासाठी चक्रे फिरवली होती. यातील दोन संशयित आरोपी उमेश पांडूरंग राजपूत आणि किरण शरद राजपूत रा. पिंप्राळा जळगाव यांना रामानंद नगर पोलीसांनी जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून ताब्यात घेतले आहे. दोघांना रामानंद नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या उपस्थितीत दोघांची कसून चौकशी सुरू आहे. तपास पो.नि. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत. पोलीस नाईक प्रविण जगदाळे, सुशील चौधरी, विजय खैरे, रवी पाटील, शिवाजी धुमाळ, संदीप महाजन, पोहेकॉ संजय सपकाळे, पो.कॉ. उमेश पवार, गिते यांनी कारवाई करत इतरांना अटक केली आहे.