Jalgaon जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिलेचा विनयभंग करून तिच्या कुटुंबियांना धमकावल्या प्रकरणी न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, शाहूनगर परिसरातील रहिवासी असणारी महिला ही २ मे २०२२ रोजी मंदिरात गेली होती. येथे राम बालकदास यांनी लज्जास्पद वाटेल, असे कृत्य करून विनयभंग केला. या प्रकरणात महाराजविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा शहर पोलिसांनी नोंदवून घेतला असला तरी पोलिसांनी त्याला नंतर सोडून दिले. यानंतर त्या महिलेने तक्रार मागे घ्यावी म्हणून महाराजसह सहा जणांनी घरावर हल्ला केला. तरी पोलिसांनी याची तक्रार नोंदवून घेतली नाही.
यामुळे त्या महिलेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बुधवारी निकाल देतांना या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिलेत. यानुसार राम बालकदास, सागर संजय पोळ, गोलू तुकाराम रणसिंघे, गौरव युवराज डांबे, प्रवीण पांडुरंग निंबाळकर (रा.शाहूनगर) या सहा जणांविरुद्ध विनयभंग, चोरी, कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यातील राम बालकदास हा पुजारी आहे.