भुसावळ, प्रतिनिधी | नागपूर येथे १७ वी १६ वर्षाच्या आतील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव ने मुंबईला नमवत तृतीय स्थान मिळविले . स्पर्धेचा अंतिम सामना नागपूरने पुण्याला नमवत पटकाविले.
विभागीय क्रीडा संकुल मानकापूर नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय राज्यभरातून ३२ संघांनी सहभाग घेतला होता. दिवस रात्र प्रकाश झोतात झालेल्या स्पर्धेत जळगाव संघाने साखळी सामन्यात कोल्हापूर, नंदुरबार या संघाचा पराभव केला. उपउपांत्य फेरीत भंडाराला नमविले, उपांत्य फेरीत नागपूरशी १२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या जळगाव, मुंबई सामन्यात मुंबईला अत्यंत चुरशीच्या सामन्यात अवघ्या ३ धावांनी बाजी मारत तृतीय स्थान पटकावले.स्पर्धेतील विजेतेपद नागपूरने पुण्याला चार गड्यांनी नमवत अजिंक्यॉपद स्पर्धा जिंकली.स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू उत्तर प्रदेश येथील सलेमपुर येथे होणाऱ्या २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. जळगावच्या संघास राज्यमंत्री आ. सुधाकर देशमुख, नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. एस. एन. पटवे, नगरसेवक झुल्फीकार अली भुट्टो, भूषण शिंदे ,राज्य संघटनेचे सचिव मोहम्मद बाबर, उपाध्यक्ष बाबूलाल धोत्रे ,सायमा सिद्दिकी, मुकुंद झन्कार, अमजद खान, योगेश परदेशी, जिल्हा सचिव वासेफ पटेल, मजीद शेख, प्रतिक कुलकर्णी, तारीख अहमद, राहुल कोळी, विकास वर्मा, वसीम शेख यांच्या हस्ते रोख पारितोषिक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.