जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नियमित सत्राच्या विषयांच्या व या पूर्वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण, विषयांच्या गुणात सुधारणा करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा १० डिसेंबरपासून ऑफलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एमसीक्यू पद्धतीने होणार आहेत.
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या नियमित सत्राच्या विषयांच्या व या पूर्वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण, विषयांच्या गुणात सुधारणा करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा १० डिसेंबरपासून ऑफलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एमसीक्यू पद्धतीने होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन परीक्षा पद्धतीत बदल झाल्यास विद्यार्थ्यांना कळवले जाणार आहे. याशिवाय वेळापत्रक व परीक्षा अर्ज सादर करण्याच्या तारखांची माहिती यथावकाश कळवली जाणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील यांनी दिली आहे.
सर्व पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी १२ ते २० ऑक्टोबर या कालावधीतील वेळापत्रकातील सर्व विषयांसंबंधित परीक्षा १८ ते २० नोव्हेंबर आणि २४ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरदरम्यानच्या वेळापत्रकातील सर्व विषयांसाठीची परीक्षा २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत वेळापत्रकातील सर्व विषयांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या http://nmu.ac.in/examination.aspx या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.