जळगाव प्रतिनिधी | माजी उर्जा मंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत बैठकांसह शाखांचे उदघाटन होणार आहे.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळ आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे जळगाव जिल्हा दौर्यावर येणार असल्याची माहिती आधीच समोर आली होती. या अनुषंगाने या दोन्ही मान्यवरांचा जिल्हा दौरा निश्चीत झाला असून २२ व २३ जुलै रोजी जळगाव दौर्यावर येणार असल्याची माहिती महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये शहरात भाजपच्या शाखांचे उदघाटन करण्यात येणार आहे. २३ रोजी हेल्थ वॉरियर्सची बैठक होईल. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता भाजयुमोची बैठक होणार आहे. या बैठकीत विक्रांत पाटील यांचे मुख्य मार्गदर्शन राहणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे आणि विक्रांत पाटील यांच्या या दौर्यातील कार्यक्रमांमद्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष , लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.