Home Cities जळगाव विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे जळगावात दाखल

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे जळगावात दाखल

0
46

जळगाव प्रतिनिधी | विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे या जिल्हा दौर्‍यावर आल्या असून त्यांचे अजिंठा विश्रामगृहात स्वागत करण्यात आले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे या जळगावच्या दौर्‍यावर आल्या असून त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आणि शिवसेनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास डॉ. गोर्‍हे यांचे अजिंठा विश्रामगृहात आगमन झाले असता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्यासह संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, महापौर जयश्री महाजन, सरीता माळी-कोल्हे, शोभा चौधरी आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound