जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये पारा चढल्याचे दिसून आले. आज दुपारी अडीच ते चार वाजेच्या दरम्यान ठिकठिकाणी दिवसभरातील सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उष्णता वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. यात मंगळवार दिनांक १८ एप्रिल रोजीचा दिवस देखील मोठ्या प्रमाणात हॉट असल्याचे दिसून आले. आज दुपारी अडीच ते चार वाजेच्या दरम्यान महत्वाच्या शहरांमध्ये खालील प्रमाणे तापमान नोंदविण्यात आले. याबाबतची माहिती हवामानतज्ज्ञ तथा काऊन्सीलर निलेश गोरे ( वेलनेस वेदर आणि वेलनेस फाऊंडेशन ) यांनी दिली आहे. तर जाणून घ्या जिल्ह्यातील प्रत्येक शहरात आज नेमके किती तापमान होते ते ?
जळगाव : ४५ अंश सेल्सियस
भुसावळ : ४५ अंश सेल्सियस
अमळनेर : ४४ अंश सेल्सियस
बोदवड : ४३ अंश सेल्सियस
भडगाव : ४४ अंश सेल्सियस
चोपडा : ४३ अंश सेल्सियस
चाळीसगाव : ४२ अंश सेल्सियस
धरणगाव : ४३ अंश सेल्सियस
एरंडोल : ४४ अंश सेल्सियस
फैजपूर : ४४ अंश सेल्सियस
जामनेर : ४५ अंश सेल्सियस
मुक्ताईनगर : ४४ अंश सेल्सियस
पारोळा : ४३ अंश सेल्सियस
पाचोरा : ४४ अंश सेल्सियस
रावेर : ४४ अंश सेल्सियस
वरणगाव : ४५ अंश सेल्सियस
यावल : ४३ अंश सेल्सियस
या प्रकारे आज जळगाव जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या शहरांमधील तापमान नोंदविण्यात आलेले आहे. हे सर्व तापमान अचूक मानल्या जाणार्या वेदर पोर्टल्सच्या डाटाबेसवरून घेण्यात आलेले आहेत. याला आम्ही वेलनेस वेदरच्या सौजन्याने प्रकाशित केले आहे.