राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात ८ डिसेंबर पासून संजीवनी दिनानिमित्त सुरू होणाऱ्या लाडकी युवती फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्याचा १६ वर्षातील मुलींचा संघाची निवड घोषित करण्यात आली असून कर्णधारपदी जळगावची सिद्धी ठाकरे तर उपकर्णधारपदी भुसावळची संस्कृती मेढे हिची निवड करण्यात आली आहे. या संघाच्या संघ प्रशिक्षक म्हणून सेंट जोसेफची क्रीडा शिक्षिका रोहिणी सोनवणे आणि व्यवस्थापक म्हणून शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयाची क्रीडा शिक्षिका हिमाली बोरोले यांची निवड करण्यात आली.

जळगाव जिल्हा संघाच्या संरक्षकपदी पोदार इंटरनॅशनलची छाया बोरसे-पाटील व वर्षा सोनवणे, क्रीडांगण समिती प्रमुख वसीम शेख यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी घोषित केले.

संघाची निवड घोषित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे प्रशिक्षक तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त किशोर चौधरी यांनी केली. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे, सचिव फारूक शेख ,सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक भास्कर पाटील ,मनोज सुरवाडे, आमिर शेख , ताहेर शेख सह रोहिणी सोनवणे, हीमाली बोरोले, वर्षा सोनवणे ,छाया बोरसे पाटील, आकाश कांबळे, मोहसीन शेख, नशिराबादचे रियाज शेख आदींची उपस्थिती होती.

Protected Content