रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात एका धक्कादायक घटना समोर आली आहे. यात परप्रांतीय दाम्पत्यातील पहिल्या दिवशी पत्नीने नदीकाठच्या झाडाला गळफासघेवून आत्महत्या केली. तर दुसऱ्याच दिवशी पत्नीने देखील शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण (वय ४४), प्यारीबाई सुकलाल चव्हाण (वय ४२, रा. बेलखेडा, मध्यप्रदेश) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण हे आपल्या पत्नी प्यारीबाई सुकलाल चव्हाण यांच्या सोबत वस्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण या प्रौढाने भोकर नदी जवळील एका बाभळीच्या झाडाला शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह रविवारी ९ जून रोजी आढळून आला. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या दिवशी खिरोदा प्र. रावेर गावाजवळील रसलपूर आभोडा रोडवरील कमलेश नथ्थु महाजन यांच्या शेतात प्यारीबाई सुकलाल चव्हाण या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी शेतमालक कमलेश महाजन यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ विभागाचे डीवायएसपी कृष्णकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, तुषार पाटील, सतिश सानप, सचिन घुगे, राहुल परदेशी यांनी धाव घेतली.