जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 51.4 टक्के पावसाची नोंद

rain
जळगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमानाने वार्षिक सरासरीची पन्नाशी पार केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 51.4 टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 663.3 मिलीमीटर इतके असून मागील वर्षी 6 ऑगस्ट, 2018 पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त 39 टक्के म्हणजेच 256.2 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी मात्र 340.8 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे.

 

 

जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक 66.3 टक्के इतका पाऊस जामनेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच 44.4 टक्के पाऊस भडगाव तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात 6 ऑगस्ट रोजी एका दिवसात 11.7 मिलीमीटर सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय आजपर्यंत (6 ऑगस्ट, 2019) पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका – 344.4 मिलीमीटर (50.1 टक्के), जामनेर- 478.7 मि.मी.,(66.3), एरंडोल- 348 मि.मी. (55.8), धरणगाव – 299.2 मि.मी. (48), भुसावळ – 369.1 मि.मी. (55.6), यावल – 355.8 मि.मी. (51), रावेर – 346.5 मि.मी. (51.9), मुक्ताईनगर – 366.3 मि.मी. (58.6), बोदवड – 358.3 मि.मी. (53.3), पाचोरा – 389.8 मि.मी. (52.4), चाळीसगाव – 371.8 मि.मी. (45.7), भडगाव – 267.5 मि.मी. (44.4) अंमळनेर – 259.5 मि.मी. (44.6), पारोळा – 298.5 मि.मी. (48.4), चोपडा – 298.3 मि.मी. (46.9) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 51.4 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Protected Content