जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री पद रखडले होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नेमके कोण होणार ? याबद्दल जळगाव वासियांच्या मनामध्ये उत्सुकता होती अनेक जण याविषयी तर्कवितर्क ही लढवत होते. मात्र या सर्व चर्चांना आता विराम बसणार असून जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची यांची नियुक्ती झाली आहे.
थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. यासह धुळे,लातूर, नांदेड, जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी क्रीडा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा देखील थोड्याच वेळात होणार आहे.
दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याची अतिरिक्त जबाबदारी देखील टाकण्यात आलेली आहे. अर्थात, ते आता जळगाव सोबतच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री देखील असणार आहेत.