ब्रेकींग : जिल्ह्यातील १४० गावांमध्ये रंगणार लोकनियुक्त सरपंचपदाचा सामना !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यात जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, राज्य निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील तब्बल ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद हे थेट निवडणुकीतून निवडले जाणार असून यासोबत ग्रामपंचायत सदस्यांची देखील निवड होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम हा खालीलप्रमाणे आहे.

१८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील.
नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.
या निवडणुकीची मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होईल.

दरम्यान, या ग्रामपंचायतींमध्ये जळगाव जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या गावांमध्ये लोकनियुक्त सरपंचपद आणि ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. यामुळे या गावांमध्ये आजपासून खर्‍या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

 

 

 

 

Protected Content