अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री.अरविंद केजरीवाल यांना काल रात्री ईडीकडून अटक करण्यात आली असून याच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीने अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले व तहसीलदार साहेब यांना सदर निवेदन देण्यात आले.
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी म्हटले की भाजपाच्या इशारावर चालणाऱ्या ईडीने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाचे पालन न करता सूडबुद्धीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली कालचा दिवस हा लोकशाहीचा काळा दिवस म्हणता येईल एकीकडे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना संपूर्ण देशात आचारसंहिता लागू असताना आम आदमी पार्टीने या निवडणुकीत भाग घेऊ नये, या हेतूने इडी चा वापर करून आम आदमी पार्टीला रोखण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे .
अत्यंत कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेले आम आदमी पार्टी रोखण्यासाठी नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा सपाटा भाजपा सरकारने चालवलेला आहे आशा कारवायामुळे देशांमध्ये लोकशाही व संविधान जीवंत राहणार नाही ईडी, सीबीआय कोर्ट, सीआयडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भाजपा सरकार यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवत आहे. ही देशासाठी धोक्याची घंटा असल्याचे जिल्हाध्यक्ष मिलिंद चौधरी यांनी म्हटले आहे. या निषेध आंदोलनात युवा आघाडीच्या राज्य कार्यकारणी सदस्य चंचल सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार, संघटन मंत्री नामदेव पाटील, अमळनेरचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, जळगाव शहराचे माजी महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर, जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख योगेश भोई, ओम अग्रवाल, नारायण पाटील, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका संघटक रामकृष्ण देवरे तालुका सचिव योगेश पाटील, डॉ रुपेश संचेती, रियाज बागवान, सलीम भाई, डॉ.महेंद्र साळुंखे, देविदास पाटील, दुर्गेश पवार, उमाकांत ठाकूर, नंदू जगन्नाथ पाटील, प्रतिभा पाटील, प्रभाकर पाटील आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.