Home Cities जळगाव आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये देवेश भय्याला सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये देवेश भय्याला सुवर्णपदक

0
70

जळगाव प्रतिनिधी | दुबई येथे पार पडलेल्या अठराव्या आंतराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिंपियाडमध्ये जळगाव येथील देवेश भय्या याने भारताकडून प्रतिनिधीत्व करतांना सुवर्णपदक पटकावले आहे.

दुबई येथे १२ ते २१ डिसेंबर दरम्यान अठरावी इंटरनॅशनल ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धा पार पडली. जळगावच्या देवेश भय्या या विद्यार्थ्याने देशाचे प्रतिनिधित्व केलेह होते. यासाठी देशातून सहा विद्यार्थ्यांची निवड झाली होती. महाराष्ट्रातून देवेश हा एकमेव विद्यार्थी होता.
देशातील लाखो विद्यार्थ्यांमधून अंतिम ३५ आणि त्यातून या ६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या सहाही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले असून, भारताच्या या टीमने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या ऑलिम्पियाडमध्ये ५९ देशांमधील ३२४ विद्यार्थी सहभागी झाले होते. इयत्ता आठवीतच असताना ही परीक्षा देऊन सुवर्णपदक मिळवणारा देवेश हा देशातील पहिलाच विद्यार्थी आहे.

देवेश हा आर्किटेक्ट पंकज भय्या व इंटेरियर डिझायनर पल्लवी भय्या यांचा मुलगा असून, एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याला शाळेचे संचालक जितेंद्र पाटील, कृणाल राजपूत व प्राचार्य शिल्पा मल्हारा यांचे मार्गदर्शन लाभले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये यश संपादन केल्यामुळे त्याचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound