जळगाव प्रतिनिधी । शहरातून जाणार्या महामार्गावरील दादावाडी समोरच्या रस्त्याची दुर्दशा संपण्याची आता चिन्हे दिसून येत आहेत. आज आमदार राजूमामा भोळे यांनी याची पाहणी केल्यानंतर यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दादावाडी समोरच्या रस्त्याची अतिशय भयंकर अवस्था झालेली आहे. यामुळे येथून जाणार्या वाहनधारकांना अतिशय डोकेदुखी सहन करावी लागत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने दादावाडी परिसरातील रस्त्यावर वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.
या पार्श्वभूमिवर, आज आमदार राजुमामा भोळे यांनी आज या रस्त्याची पाहणी केली. त्यांच्या निर्देशानुसार आज या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील हे उपस्थित होते.