जळगावातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

galfas atmhatya

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दादावाडी येथे राहणाऱ्या 35 वर्षीय तरूणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रितेश रविंद्र कदम (वय-35) रा. श्रीराम नगर, दादावाडी हे खासगी विमा कंपनीत काम करतो. त्याचे तीन मजली घर असून तिसऱ्या मजल्यावर रितेश एकटा राहत असल्याने बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवन करून रितेश झोपायला गेला. सकाळी ८ वाजेपर्यंत रितेश उठला नसल्याने आई मंदा कदम यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने भाऊ दिपेशने दरवाजा उघडून पाहिले असता रितेशने घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मुलाचा मृतदेह पाहुन आईने हंबरडा फोडला.

जिल्हा रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला. मयत रितेशच्या पश्चात आई मंदा, वडील परीवहनचे सेवानिवृत्त कर्मचारी रविंद्र कदम, भाऊ दिपेश खासगी रूग्णालयात काम करतो. गळफास घेण्याचे अद्याप कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content