जळगावात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

hangging

hangging

जळगाव प्रतिनिधी । पत्नी कामावर गेली असतांना पतीने घरात कुणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, मिलींद निळकंठ शिंपी (वय-38) रा. हरीविठ्ठल नगर रिक्षा चालविण्याचे काम करतात. तर पत्नी सरलाबाई शिंपी ह्या देखील कामाला जातात. पत्नी सरला ह्या कामावर गेलेले असतांना घराच्या वरच्या मजल्यावर दुपारी 2 वाजेनंतर कोणीही नसतांना दार आतून बंद करून दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्यांची मुलगी दिशा ही 5 वाजता शाळेतून आल्यानंतर बंद दार ठोठावण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने खाली राहणारे मिलींद शिंपी यांचे मोठे बंधू प्रकाश शिंपी यांनी दरवाजा तोडला. घरात येतात मिलींद शिंपी यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची निदर्शनास आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. ते होमगार्ड कर्मचारी प्रकाश शिंपी यांचे लहाना बंधू होते. मयताच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी, पत्नी, मुलगा पवन आणि मुलगी दिशा असा परीवार आहे.

Protected Content