जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट आणि गांधी मार्केटमधून दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल संतोष आढळे वय 20 रा. भूषण कॉलनी हा गोलाणी मार्केटमध्ये पार्ट टाईम काम करतो. आज सकाळी गोलाणी मार्केट जवळील डिलाइट बेकरी समोर सकाळी 9 वाजता पार्कीगला दुचाकी क्रमांक (एमएच 19 बीटी 7242) लावली. त्यानंतर दुकानाच्या कामानिमित्त गाडीजवळ गेले असता दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहकॉ ठाकरे करीत आहे. दुसऱ्या घटनेत शहरातील गांधी मार्केटमध्ये भंगाराचे दुकान असलेले मोहम्मद फरूख अब्दुल वाहेद (वय-50) रा. उस्मानिया पार्क यांची दुचाकी क्रमांक (एमएच 19 बीएक्स 4984) आज सकाळी 11 वाजता मार्केटमधील पार्कींगला लावली होती. दुपारी दुकानाच्या कामानिमित्त दुचकीजवळ गेले असता दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी मोहम्मद फारूख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.