जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज कायदा प्रतिनिधी | वाहन अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बांधकाम कारागिराच्या वारसांना ३२ लाख रूपयांची भरपाई देण्यात यावी असे निर्देश जळगाव न्यायालयाने दिले आहेत.
जळगाव तालुक्यातील धानवड येथिल सेंट्रींग काम करणारे भास्कर जनार्दन जोगी यांचा २०१६ मध्ये ट्रक अपघातात मृत्यू झाला होता. याबाबत मोटार वाहन अपघात न्यायालयात मयताची पत्नी छायाबाई भास्कर जोगी यांनी विधीज्ज्ञ एस. टी. पवार यांच्या मार्फत दाद मागीतली होती.
मयत भास्कर जर्नाधन जोगी याचे . मृत्यू समयाी वय २७ वर्ष होते व कामावरील रोज ६०० रुपये या अर्थाने महिण्याचे उत्पन्न १८ हजार गृहित धरत भास्कर जोगी याच्या वारसांना ३२ लाख ९० हजार चारशे अंशी रुपये नुकयान भरपाई देण्याचे आदेश संबधीतांना न्या. बी. एस. वावरे यांच्या न्यायालयाने दिले आहेत.