जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाची कमी झालेली रूग्णसंख्या ही आज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ४७ कोरोना बाधीत आढळून आले असून १४१ जण बरे झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील रूग्णसंख्या ही पन्नासच्या आत आल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. गत चोवीस तासांमधील रूग्णसंख्येतही हाच ट्रेंड कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसभरात जिल्ह्यात ४७ कोरोना बाधीत आढळून आले असून याच कालावधीत १४१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एक दिवसात एका कोरोना बाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील रूग्णसंख्येचा विचार केला असता जळगाव शहर व जळगाव ग्रामीण : प्रत्येकी दोन; भुसावळ, एरंडोल, धरणगाव, यावल आणि चाळीसगाव : प्रत्येकी तीन; अमळनेर आणि मुक्ताईनगर : प्रत्येकी दोन; चोपडा, पाचोरा, जामनेर आणि रावेर : प्रत्येकी चार; पारोळा :५ आणि बोदवड व बाहेर जिल्ह्यातील : प्रत्येकी एक असे पेशंट आढळून आले आहेत.