Jalgaon Corona Updates जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला संसर्ग कायम असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ९९४ रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव व चोपड्यासह आता भुसावळात देखील कोरानाचा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे.
आज जळगाव शहरात सर्वाधीक २९० Corona रूग्ण आढळून आले आहेत. यासोबत चोपडा तालुक्यात १६० रूग्ण आढळून आले आहेत. तर भुसावळात तब्बल २२२ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर आजच ७१९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता जळगाव ग्रामीण-५७; अमळनेर-११; पाचोरा-१५; भडगाव-६२; धरणगाव-६६; यावल-३२; एरंडोल-१; जामनेर-१९; पारोळा-५१; चाळीसगाव-४५; बोदवड-३ तर मुक्ताईनगर आणि रावेरात आज Corona रूग्ण आढळून आले नाहीत. आज दिवसभरात ८ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले असले तरी कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतच आहे. आजवर जळगाव शहरासह पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, धरणगाव आदी शहरांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आले आहेत. मात्र अजूनही संसर्ग कमी होतांना दिसून येत नाही. यामुळे आता अन्य तालुक्यांमध्येही याच प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील असे संकेत आता मिळाले आहेत.
यातील अजून महत्वाचा मुद्दा हा मृत्यूचे वाढलेले प्रमाण हा देखील आहे. आजचाच विचार केला असता जिल्ह्यात आज आठ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर ३२८ रूग्णांची प्रकृती ही चिंताजनक असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. खरं तर मृत्यू दर हा १.९३ टक्के इतका कमी असला तरी रूग्णांच्या संख्येत घट होत नसल्याची बाब ही प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरली आहे.
जळगाव जिल्ह्यात रविवार सायंकाळपर्यंत एकूण सक्रीय रूग्णांची संख्या ९७०१ इतकी असून यातील ७५०० रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर २२०१ पेशंटला मात्र लक्षणे आढळून आलेली आहेत. या सर्वांवर शासकीय आणि खासगी रूग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे.