जळगाव प्रतिनिधी । कोरोना लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात पोलिस कर्मचार्यांसह त्यांच्या कुटुंबांसाठी उद्यापासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
कोविडची आपत्ती सुरू झाल्यापासून पोलीस कर्मचारी थेट मैदानावर याच्या प्रतिकारासाठी उतरले आहेत. आजवर अनेक अधिकारी व कर्मचारी बाधीत झाले असून यात काहींचा मृत्यू देखील झालेला आहे. या पार्श्वभूमिवर, लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना सोमवारपासून लस देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सकांनी दिली आहे.
पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लस देण्यात यावी, यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पाठपुरावा केला आहे. यासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालयाला पत्र पाठविले होते. याची दखल घेऊन रुग्णालयाने लसीकरणास परवानगी दिली आहे. सोमवारपासून पोलिस मल्टिपर्पज हॉल येथे लसीकरणास सुरूवात होणार आहे.