जळगाव प्रतिनिधी । सध्या ऑक्सीजनची वाढीव मागणी सुरू असतांना रोटरी क्लब ऑफ ईस्टने नागरिकांसाठी अल्प दरात तीन ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर मशिन्स उपलब्ध करून दिले आहेत.
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टने कोरोनाचा वाढता फैलाव पाहता तीन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खरेदी करून जनसेवेत उपलब्ध केले आहेत. जळगाव शहरातील रुग्णांसाठी अल्पदरात भाडे घेऊन ही यंत्रणा सामान्य नागरिकांना घरी मिळू शकणार आहे. बरे होण्याच्या मार्गावर आहेत मात्र, त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार काही काळ ऑक्सिजन लागण्याची शक्यता असते, अशा रुग्णांना हे कॉन्सट्रेटर मिळू शकणार आहे.
या उपक्रमाला जळगाव जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, रोटरी उपप्रांतपाल अपर्णा मकासरे, डॉ. जगमोहन छाबडा यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टचे अध्यक्ष भावेश शाह, सचिव हितेश मोतीरमानी, डॉ. राहुल भन्साली, संजय गांधी, संजय शाह, संजय भंडारी, विजय लाठी, गोविंद वर्मा, सचिन खडके, शरद जोशी उपस्थित होते.