जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढलेलीच असली तरी गेल्या चोवीस तासांमध्ये पॉझिटीव्ह रूग्णांपेक्षा कोरोनाच्या संसर्गावर मात केलेल्या रूग्णांची संख्या जास्त असल्याची दिलासादायक बाब आढळून आली आहे. जिल्ह्यात आज ११४२ जणांना कोरोनाची बाधा झाली असली तरी १२२२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जळगाव शहर-२४९, जळगाव ग्रामीण-३६, भुसावळ-१६९, अमळनेर-७६, चोपडा-११५, पाचोरा-४३, भडगाव-३७, धरणगाव-४३, यावल-६६, एरंडोल-५४, जामनेर-१३, रावेर-२७, पारोळा-५७, चाळीसगाव-६८, मुक्ताईनगर-५७, बोदवड-२९ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १ हजार १४२ रूग्ण आढळून आले आहे.
कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत ९१ हजार ३२७ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ७७ हजार ९५६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ७१८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव शहर-६, भुसावळ-५, अमळनेर-३, धरणगाव -१ असे एकुण १४ जणांचा मृत्यू झाला आहे, आजच १ हजार २२२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.