जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर आणि चोपडा तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट आज देखील कायम असून जिल्ह्यात ११३९ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर दिवसभरात १४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नांची शर्थ करतांना दिसत आहे. मात्र कोरोनाचे प्रमाण कमी होतांना दिसून येत नसल्याचे आज प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालांमधून अधोरेखीत झाले आहे. आज जिल्ह्यात ११३० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यात सर्वाधीक रूग्ण हे जळगाव शहर तर याच्या खालोखाल चोपडा तालुक्यातील आहेत.
जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव शहर-२८३, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ-७७, अमळनेर-९३, चोपडा-२७७, पाचोरा-३५, भडगाव-२०, धरणगाव-५६, यावल-२८, एरंडोल-४८, जामनेर-३३, रावेर-२१, पारोळा-१८, चाळीसगाव-९७, मुक्ताईनगर-११, बोदवड-१७ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण १ हजार १३९ रूग्ण आढळून आले आहे.
कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत ८९ हजार १८ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ७५ हजार ५९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ८०३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव शहर-४, चोपडा-३, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, पाचोरा-१, धरणगाव-१, जामनेर-१, पारोळा -१ आणि चाळीसगाव-१ असे १४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.