जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील कोविड रूग्णालयांसाठी नोडल अधिकार्यांची Nodal Officers नियुक्ती केली असून या माध्यमातून रूग्णांच्या सुविधांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागलेली आहे. अगदी आधीपेक्षाही जास्त रूग्ण आता आढळून येत असल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सक्तीचे जनता कर्फ्यू लावण्यात आले असून काही ठिकाणी लॉकडाऊन देखील लावण्यात आलेले आहेत. यातच जिल्हाधिकार्यांनी सिव्हील हॉस्पीटलला डेडीकेटेड कोविड रूग्णालय म्हणून घोषीत केले आहे. तर नियमित रूग्णांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शाहू रूग्णालयात सुविधा उपलब्ध केलेली आहे.
दरम्यान, यासोबत आता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोविड रूग्णालयांमध्ये Nodal Officers नोडल अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. या रूग्णालयांमध्ये कर्मचार्यांची उपस्थिती, हाऊस किपींग, जेवणाची सुविधा व इतर तत्सम सुविधा याबाबींच्या अनुषंगाने सदर ठिकाणी उदभवणार्या प्रशासकीय तसेच नागरिकांच्या अड़ी अडचणी सोडवण्याकामी, संबंधित आस्थापनेच्या अधिकारी / कर्मचारी यांना सोई सुविधा उपलब्ध करुन देणे व समन्वय राखणे याकरीता हे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
या अधिकार्यांमध्ये-
१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे किरण सावंत पाटील, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)
२) गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे डिगंबर लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामिण पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद,
३) इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जि.का.जळगाव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या तिन्ही नोडल अधिकार्यांनी कोविड रूग्णालयांमध्ये वेळोवेळी उद्भवणार्या प्रशासकीय बाबी तसेच नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरीता संबंधित आस्थापनेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. सदर आदेशाचे उल्नंघन अथवा भंग केल्यास सदर बाब हो आपत्तो व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७, भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहील असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या नोटिफिकेशनमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान शहरात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून, यात लक्षणे नसलेले अनेक रुग्ण आहेत. या रुग्णांचा होम आयसोलेट होण्यावर भर आहे; मात्र पॉझिटिव्ह आलेला रुग्ण स्वतः बाहेर फिरून होम आयसोलेशनची प्रक्रिया पूर्ण करत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी यातून संसर्ग वाढत असल्याने होम आयसोलेशनची प्रक्रिया रुग्णाच्या नातेवाइकांनी पूर्ण करावी अशा सूचना महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहे.