जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गत २४ तासांमध्ये २७ नवीन कोरोना बाधीत आढळून आले असून यात ११ तालुक्यांमध्ये एकही रूग्ण आढळून आलेले नाहीत हे विशेष.
जिल्हा प्रशासनाने गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना बाधीत रूग्णांबाबतचा अहवाल आज सायंकाळी जाहीर केला आहे. यात आज २७ नवीन कोरोना बाधीत आढळून आले असून ३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजचे वैशिष्ट्य म्हणजे जळगाव, भुसावळ, अमळनेर व पारोळा यांचा अपवाद वगळता अन्य ११ तालुक्यांमध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नाही.
दरम्यान, जिल्ह्यात आजवर ५२०७२ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या ४१० रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.