जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग तुलनेत अल्पसा कमी झाला असून आज १०४६ कोरोना बाधीत पेशंट आढळून आले असले तरी १००६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज पुन्हा एकदा एरंडोल व रावेर तालुक्यातील संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या ही बाराशेच्या आत होती. तर आता हा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसून आले आहे. आज दिवसभरात पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही पुन्हा एकदा अकराशेच्या आत म्हणजेच १०४६ इतकी झाली आहे.काल हाच आकडा १०४८ इतका होता. तर गत चोवीस तासांमध्ये १००६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता बाधीत आणि बरे होणार्यांचे प्रमाण जवळपास समान असल्याचे दिसून आले आहे. तर आज देखील काल प्रमाणेच दिवसभरात जिल्ह्यात २१ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजच्या रूग्णसंख्येचा विचार केला असता पुढील प्रमाणे रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर-१६५; जळगाव ग्रामीण-३२; भुसावळ-९७; अमळनेर-४१; चोपडा-११०; पाचोरा-६०; भडगाव-२७; धरणगाव-३०; यावल-३६; एरंडोल-१०१; जामनेर-६३; रावेर-१०२; पारोळा-३७; चाळीसगाव-४३; मुक्ताईनगर-७३; बोदवड-२२ आणि इतर जिल्ह्यांमधील ७ असे रूग्ण आढळून आले आहेत.