जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी हद्दीत बुधवारी रात्री नाकाबंदी करून कोम्बिंग ऑपरेशन राबत गुन्हेगारांची धरपकड एमआयडीसी पोलीसांच्या वतीने करण्यात आले. यात न्यायालयाने पकड वारंट जारी केलेले असतांना पोलीसांना गुंगारा देत फरारी असलेले चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी हद्दीतील रामेश्वर कॉलनी, मेहरूण परीसर, तांबापूरा, कंजरवाडा, अयोध्यानगर, अजिंठा चौफुली, एमआयडीसी कंपनीतील भाग, सुप्रिम कॉलनी या भागात एमआयडीसी पोलीसात रात्री 11 ते सकाळी 5 वाजेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी न्यायालयाने पकट वारंट जारी केलेले असतांना पोलीसांना गुंगारा देत फरार असलेले आरोपी सुरेश मिश्रीलाल चव्हाण रा. मंगल पुरी, सागर सुरेश चव्हाण रा. मेहरूण, प्रशांत पांडुरंग नेहते रा. रामेश्वर कॉलनी, अनिल सुकलाल पाटील रा. आयोध्यानगर जळगाव या चौघांना अटक करण्यात आली.
यावेळी रात्री 11 ते सकाळी 5 वाजेदरम्यान एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, राजेंद्र सैंदाणे, संजय धनगर, नितीन पाटील, निलेश पाटील यांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यावेळी पोलीसांनी एमआयडीसी हद्दीतील 9 बँका, 10 एटीएम, 3 लॉज, 4 हॉटेल धाबे, 6 हॉटेल यासह रेकाँर्डवरील 7 गुन्हेगारांची तपासणी करण्यासाठी नाकाबंदी करत 25 वाहनांची तपासणी करण्यात आले होते.