एरंडोल प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एरंडोल येथे खासगी रूग्णालयांना आकस्मिक भेट देऊन तेथील सेवांची माहिती जाणून घेतली.
जिल्हाधिकार्यांनी बुधवारी अचानक एरंडोल येथील चार खासगी दवाखाने गाठून तेथील रुग्णांची विचारपूस देखील केली. त्यांनी डॉ.सुयश पाटील, डॉ.शाह, डॉ.सुयश पाटील व डॉ.हेमंत पाटील यांच्या शहरातील खासगी दवाखान्यांना भेट दिली.
प्रारंभी अभिजीत राऊत यांनी प्रांत कार्यालयात कोरोनाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. कोरोना रुग्ण संख्या वाढीची कारणे जाणून घेतली. यानंतर त्यांनी रूग्णालयांना भेट दिली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत प्रांत विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, मुख्याधिकारी किरण देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कैलास पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख, पालिका कार्यालय अधीक्षक संजय धुमाळ उपस्थित होते.
खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणार्या प्रत्येक कोरोना संशयितांना स्वॅब देण्यास पाठवावे. शासनाने बनवलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपवर रुग्णांची माहिती दररोज पाठवावी, अशी सूचना केली. यानंतर इतर खासगी डॉक्टरांकडे प्रांताधिकार्यांनी भेट द्यावी, अशा सूचना अभिजीत राऊत यांनी या भेटीत दिल्या.