भरधाव ट्रकच्या धडकेत मुलाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणार्‍या बालकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मोहाडी गावाजवळ घडली.

या संदर्भातील वृत्त असे की, सुजय गणेश सोनवणे (वय१३) हा मुलगा आज दुपारी साडे अकराच्या सुमारास जळगावहून मोहाडी गावाकडे जात होता. याप्रसंगी गावाजवळ असलेल्या उताराजवळ एमएच-२८ बी ७७०३ या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या एमएच १९ डीएम ११ या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मयत सुजय हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकरआप्पा सोनवणे यांचे पुत्र गणेश सोनवणे यांचा पुत्र होता. यामुळे सोनवणे कुटुंबावर वज्राघात झाला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजयचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून तेथे आप्तांनी प्रचंड गर्दी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जि.प. सदस्य पवन सोनवणे, जळगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल आदींसह इतरांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!