Home क्राईम कोल्हे नगरात चैन स्नॅचिंग; एक लाखाची चैन लांबविली

कोल्हे नगरात चैन स्नॅचिंग; एक लाखाची चैन लांबविली


जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोल्हे नगर परिसरात पत्ता विचारणाच्या बहाण्याने भामट्याने महिलेच्या गळ्यातील एक लाख रूपये किंमतीची अडीच तोळ्याची सोन्याची पोत हिसका देवून पळ काढल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी रामानंदगनर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक महिती अशी की, डॉ. किरण साहेबराव पाटील (वय-४५) रा. कोल्हेनगर जळगाव हे प्राध्यापक आहेत. ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांची सासू ह्या अंगणात झाडू मारत असतांना अनोळखी तरूणाने दुचाकीवर आला. त्याने महिलेला पत्ता विचारण्याचा बहाणा केला. पत्ता विचारत असतांना अचानकपणे भामट्याने महिलेच्या गळ्यातील १ लाख रूपये किंमतीची दोन तोळ्याची सोन्याची चैन हिसका देवून तोडून घेत दुचाकीवरून फरार झाले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजेश शिंदे करीत आहे. 


Protected Content

Play sound