जळगाव प्रतिनिधी । राज्य परिवहन कामगारांना शासन निर्णयानुसार 3 टक्के महागाई भत्ता थकबाकीसह दिवाळीपुर्वी देण्यात यावा यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने आज एसटी कामगारांचा निदर्शने आंदोलन नवीन बसस्थानकासमोर करण्यात आले.
एसटी कामगारांच्या या आहेत मागण्या
मान्यताप्राप्त कामगार संघटनेने दिवाळीनिमित्त रा.प.कामगारांना शासन निर्णयानुसार ३ टक्के महागाई भत्ता थकबाकीसह दिवाळीपूर्वी देण्यात यावा, तसेच दिवाळीपूर्वी ऑक्टोबर २०१९चे वेतन देण्यात यावे, सर्वच कामगारांना सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात यावे, त्याचप्रमाणे शासन निर्णयानुसार सर्वच कामगारांना १२ हजार ५०० सण अग्रिम देण्यात यावा व अन्य प्रलंबित मागण्यांच्या पुर्तता करावी अशा मागण्या करूनही प्रशासनाने रा.प.कामगारांना दिवाळीमध्ये फक्त २५०० इतकीच रक्कम देण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांनी दि.२५ ऑक्टोबर २०१९ रोजी राज्यभर निदर्शने आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केलेला आहे याची प्रशासनाने दखल घेऊन वाढीव ३ टक्के महागाई भत्याची थकबाकी द्यावी, तसेच दर्जेदार प्रवासी सेवेसाठी सुस्थितीतील गरजे इतपत नवीन गाड्यांचा पुरवठा करणे, स्पेअर पार्टस्चा पुरवठा करणे, करार/ कायदा/ परिपत्रकाचा भंग करून प्रसारीत केलेली कामगार विरोधी परिपत्रके रद्द करावी, शिस्त व अपिल कार्यपध्दतीचा भंग करून प्रसारीत केलेली परिपत्रके रद्द करावीत, प्रत्यक्ष लागणारी धाववेळ द्यावी, निरनिराळ्या सेवेचे कंत्राटीकरण व अप्रत्यक्ष होणारे खाजगीकरण रद्द करावे, तसेच सुस्थितीतीत ई.टी.आय.एम. देण्यात यावे या मागण्यांची दखल घेऊन प्रशासनाने या मागण्यांची सोडवणूक करावी. तसे न केल्यास यापुढे संघटना तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याप्रसंगी एस.टी.कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांची गर्दी जमली होती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/819965305085506/