जळगाव प्रतिनिधी । संततधार पावसाने उडीद, मुग आणि सोयाबीनचे खूप नुकसान झाले असून याचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी खा. उन्मेष पाटील यांनी केली आहे. त्यांच्या वतीने आज भाजप पदाधिकार्यांनी निवेदन दिले.
खा. उन्मेष पाटील यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव बहुतांश शेतकर्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर उडीद, मूग व सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. जिल्ह्यात मुगाचे २३ हजार हेक्टर, उडीद पिकाचे २२ हजार हेक्टर तर सोयाबीन पिकाचे २४ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र असून गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पावसामुळे उडीद व मूग पिकांच्या शेंगांमध्ये कोंब आले आहेत.
तर, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तोडणीस आलेले हाताचे पिक वाया गेले आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे संबंधित यंत्रणेला तात्काळ आदेश द्यावेत.सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने भरपाई मिळवून दयावी. अशी मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यात गेल्या ४ /५ दिवसापासून सततधार पावसामुळे मूग पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असुन यासाठी पिकांचे पंचनामे करून हेक्टरी २५००० रु मदत दयावी यासाठी भाजपा तालुक्याचे वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटिल, तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, सरचिटणीस अरुण सपकाळे,संदीप पाटील प स सदस्य मिलींद चौधरी, पंचायत समिती सदस्य हर्षल प्रल्हाद चौधरी, गिरीश वराडे, भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.