Home महिला भाजप महीला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी रंजनाताई पाटील

भाजप महीला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी रंजनाताई पाटील

0
31

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक डोळ्या समोर ठेवुन जळगाव पूर्वच्या महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा रंजना प्रल्हाद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी निवडणूका डोळ्या समोर ठेवून भाजपा तर्फे महत्वाच्या आघाड्यांवर नियुक्ती करत आहे.जळगाव पूर्वच्या महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी मोरगांव येथील रहीवासी असलेल्या सौ रंजना प्रल्हाद पाटील जळगाव जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा आहे.

त्यांची नियुक्ती भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी केली आहे.त्यांची नियुक्ती झाल्या बद्दल राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेषदादा पाटील,आ. सुरेश भोळे (राजूमामा )आ. संजय सावकारे,आ. मंगेशदादा चव्हाण, माजी.आ.श्रीमती. स्मिताताई बाप, प्रदेश चिटणीस अजय भोळे रावेर लोकसभेचे निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन आदीनी पाटील यांचे अभिनंदन केले.

सौ. रंजनाताई पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा भाजपमध्ये रावेर तालुक्याला अजून एक महत्वाचे पद मिळाले आहे. भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.


Protected Content

Play sound