जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने आज तीन जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली असून तिन्ही ठिकाणी तरूण चेहर्यांना संधी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची निवड लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत कधीपासूनच मिळाले होते. आज अखेर पक्षातर्फे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर केले आहेत. यात रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे, जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे.
भारतीय जनता पक्षाने पक्षाध्यक्षपदांसाठी तरूण चेहर्यांना संधी दिली आहे. अमोल हरीभाऊ जावळे यांना आधी विधानसभा क्षेत्रप्रमुखपदावर नियुक्त करण्यात आले होते. याच्या पाठोपाठ त्यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर हे पक्षाचे फायरब्रँड नेते असून त्यांना बढती मिळालेली आहे. तर जळगाव महानगराध्यक्षपदावर उज्वला बेंडाळे यांच्या माध्यमातून महिलेस संधी देण्यात आलेली आहे.