जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा वकील संघाची निवडणूक होत असून एकूण ११ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्हा वकील संघाची शनिवार १९ जानेवारी रोजी न्यायालयाच्या आवारातील बार कॉन्सलच्या लायब्ररीत निवडणूक होणार आहे. सकाळी नऊ ते चार वाजे दरम्यान मतदानाची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर साडेचार वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरवात होणार आहे. मतदारांची संख्या ६२२ आहे. एकूण १५ पदांपैकी ४ पदांवर बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी अॅड. मंजू वाणी, कोषाध्यक्षपदी जयेश भावसार, सदस्यांपदी अॅड. लिना म्हस्के, अॅड. प्रतिभा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उर्वरीत ११ पदासाठी २० उमेदवार रिंगणात आहे. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड.आर. एन. पाटील, सह निवडणूक अधिकारी अॅड. पी. आर. सरोदे, अॅड. कालिंदी चौधरी, निवडणूक सहाय्यक म्हणून अॅड. जयंत कुरुकरे, अॅड. कल्याण पाटील, अॅड. किशोर चव्हाण, अॅड. विरेंद्र पाटील, अॅड. श्रीकृष्ण निकम, अॅड. प्रविण जोशी काम पाहणार आहे.
अध्यपदासाठी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल असल्याने त्यांच्यात सरळ लढत होणार आहे. यात अॅड. पंढरीनाथ चौधरी, अॅड. दिपकराव खडके यांची लढत आहे. सचिव पदासाठी तीन जण रिंगणात असून यात अॅड. महेश भोकरीकर, अॅड. योगेश गावंडे, अॅड. बाळू साळी रिंगणात आहेत. सहसचिवपदासाठी अॅड. रविता देवराम, अॅड. प्रतिभा पाटील, अॅड. छाया सपके रिंगणात आहे. पुरुषांच्या ८ सदस्याच्या जागांसाठी बारा अर्ज आले असून यात अॅड. श्रीराम बारी, अॅड. प्रविण चित्ते, अॅड. सुनील इंगळे, अॅड. शैलेष नागला, अॅड. नवसिंग नाईकडा, अॅड. समाधान पावसे, अॅड. हर्षल पाटील, अॅड. संदिप पाटील, अॅड. योगेश पाटील, अॅड. विनायक पाटील, अॅड. प्रविण राक्षे, अॅड. संतोष उदासी यांचा समावेश आहे.