जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न लाऊन देण्यासह तिचा विनयभंग केल्या प्रकरणी पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेले जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह पाच जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज जळगाव कोर्टाने फेटाळून लावला आहे.
जामनेर येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह इतरांवर पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लावण्यात आला असून तिचा पारस ललवाणी यांनी विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात एकूण सात संशयित असून यात पारस ललवाणी आणि सिल्लोड येथील सुनील कोचर यांचा समावेश आहे.
दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पारस ललवाणींसह इतरांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर आज न्यायाधिश सी. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. यात ललवाणींसह इतरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. तर यात अभियांत्रीकीचे शिक्षण घेणार्या एकाला मात्र वगळण्यात आले आहे.