जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील सम्राट कॉलनी परिसरात आज धार्मिक स्थळावर दगडफेक केल्याच्या कारणावरून काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी घटनांसाठी दाखल होऊन तणाव नियंत्रणात आणले दरम्यान रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी १७ मे रात्री ९ वाजेच्या सुमारास सम्राट कॉलनी परिसरात वाढदिवसाच्या केक कापण्यावरून काही तरुणांनी दगडफेक करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच महामार्गाजवळील सम्राट कॉलनी परिसरातील एका धार्मिक स्थळावर आज म्हणजेच शुक्रवारी १९ मे रोजी रात्री ९ वाजता काही तरुणांकडून दगडफेक केल्याची घटना घडली.
या घटनेमुळे जळगाव शहर शहरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या संदर्भात अद्यापपर्यंत कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक इमरान सय्यद यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाल्यानंतर जमावाला पांगवापांगव केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तर परिसरातील तणाव नियंत्रणात आल्याचे वृत्त आहे.