तात्यासाहेब ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कारांची घोषणा

जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणेच यंदा देखील महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त तात्यासाहेब जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात प्राथमिकच्या १९ व माध्यमिक विभागाच्या २० शिक्षकांचा समावेश असून लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त तात्यासाहेब जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. यंदा देखील प्राथमिकच्या १९ व माध्यमिक विभागाच्या २० शिक्षकांना पुरस्काराची घोषणा शनिवारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ, प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब जगताप, बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

यंदाच्या २०२१-२२च्या गुणवंत शिक्षक पुरस्कारात प्राथमिक विभागात : शिक्षक किरण मोहिते (खेडी बुद्रुक, ता. अमळनेर), रवींद्र पाटील (पिंगळवाडे, ता. अमळनेर), अशोक सोनवणे (अमळनेर), विश्वनाथ पाटील (नागलवाडी, ता. चोपडा), विशाखा सोनवणे ( खडके, ता. एरंडोल), अनिल पाटील (करगाव, ता. चाळीसगाव), शेख हनीफ शेख रशीद (मोठे वाघोदे), मनीषा शिरसाठ (पाळधी, ता.धरणगाव), रवींद्र कठोरे (पुरनाड, ता. मुक्ताईनगर), सविता जाधव (वरखेडी बुद्रुक, ता. चाळीसगाव), नीलेश पाटील (निंभोरी तांडा, ता. पाचोरा), भूषण पाटील (उतरण, ता. पारोळा), स्वप्निल निकम (तांदळवाडी, ता.भडगाव), हेमराज पाटील (सावखेडा), समाधान कोळी (साकळी), गणेश कोळी (चिंचखेड, ता. मुक्ताईनगर), मनोज किर्दक (शेलवड), किर्ती घोगडे (पहूर कसबे), दीपाली पाटील (साक्री) यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच, माध्यमिक विभाग : नरेंद्र देशमुख (खडकी, ता. मुक्ताईनगर), किरण पाटील (भुसावळ), हरिभाऊ राऊत (पहूर, ता. जामनेर), राजेंद्र गायकवाड (किनोद, ता. जळगाव), गिरीश जाधव (जळगाव), नितीन जाधव (डांभुर्णी, ता. यावल), दिनेश जगताप (चाळीसगाव), सरिता मोरे (मेहुणबारे, ता. चाळीसगाव), सिताराम भदरे (घुसर्डी, ता. पाचोरा), राजमल नवाल (उत्राण), शैलेश पाटील (धुळप्रिंपी, ता. पारोळा), शिवाजी माळी (तळई, ता. एरंडोल), मोहसीन पिंजारी (वडगाव, ता. भडगाव), चंद्रशेखर ठाकूर (लोणग्रुप, ता. अमळनेर), मनीषा पाटील (खिरोदा, )रतीलाल सोनवणे (घोडगाव), रामचंद्र धनगर (धरणगाव), प्रा रेखा महाजन (धानोरा), भगवान महाजन (साकळी) आणि आर. के. भंगाळे (ऐणगाव) यांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार निवड समिती प्रमुख म्हणून सपना रावलानी, रणजित सोनवणे, प्रतिभा पाटील यांनी काम पाहिले. तर गट प्रमुख म्हणून मनीषा देशमुख, मनोज नन्नवरे, छाया सोनवणे, हेमेंद्र सपकाळे यांनी काम पाहिले. दरम्यान, लवकरच एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Protected Content