जळगावात ॲमेझॉन कंपनीची डिलीवरी बॅग लंपास; 20 हजाराचे नुकसान

chori1

जळगाव प्रतिनिधी । ॲमेझॉन कंपनीच्या डिलीवरी बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

यश अशोक सोनार, ओमनगर आसोडा रोड हे गेल्या वर्षभरापासून शहरातील ॲमेझॉन कंपनीचे कुरीयर डीलेवरीचे काम करतो. आज सकाळी 8 वाजता 37 पार्सलची बॅग घेवून सकाळी 9.45 वाजता गिरणा टाकीजवळील लक्ष्मीनगर प्लॉट मध्ये राहणारे श्री बढे यांचे पार्सल देण्यासाठी गेले. ग्राहकाचे घर वरच्या मजल्यावर असल्याने यश सोनारने डिलीवरी बँग घराच्या आवारात ठेवले व पार्सल देण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. तेवढ्यात अज्ञात चोरट्यांनी आवारात असलेली पार्सलने भरलेली डिलीवरी बँग चोरून नेली. यात सुमारे 20 हजार रूपये किंमतीचे 24 डिलेवरी पार्सल होते. याप्रकरणी यश सोनार यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content