जळगाव प्रतिनिधी | आपल्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर विना परवानगी आंदोलन केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, राष्ट्रवादी कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. यामुळे याप्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकार्यांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच्या अंतर्गत राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, रवींद्र नाना पाटील, मंगला पाटील, कल्पिता पाटील, सुशील शिंदे, सुनील माळी, डॉ. रिजवान खाटीक यांच्यासह ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिस नाईक हर्षल सुभाष पाटील यांनी फिर्याद दिल्यानुसार रामानंद नगर पोलीस स्थानकात या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.