जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा वकील संघाच्या चुरशीच्या चौरंगी लढतीत विशेष सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी बाजी मारली आहे.
जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सुमारे ८७ टक्के मतदान झाले होते. त्यात १ हजार ४० पैकी ९०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवड प्रक्रियेची मतमोजणी शनिवारी झाली. यात सर्वांचे लक्ष अर्थातच अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले होते. यात अध्यक्षपदासाठी विशेष सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांच्यासह किशोर भारंबे, सागर चित्रे व स्वाती निकम यांच्यात लढत झाली. यात केतन ढाके यांनी बाजी मारली असून त्यांना ४७६ मते मिळाली. या निवडणूक प्रक्रीयेसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. दिलीप मंडोरे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. संग्राम चव्हाण, योगेश महाजन, ॲड. हेमंत भंगाळे, ॲड. कालिंदी चौधरी यांनी काम पाहिले.
दरम्यान, वकील संघाच्या उपाध्यक्षपदी अॅड. वैशाली महाजन यांची निवड करण्यात आली. जिल्हा वकील संघाची नवीन कार्यकारिणी ही पुढीलप्रमाणे असणार आहे. अध्यक्ष : केतन ढाके; उपाध्यक्षा : वैशाली महाजन, सचिव : स्वप्निल पाटील, सहसचिव : देवता पाटील, कोषाध्यक्ष : विशाल घोडेस्वार, सदस्य : निखील पाटील, दीपक वाघ, हर्षल देशमुख, खुशाल जाधव, अजय पाटील, नीलेश जाधव, हेमंत गिरनारे, विवेक पाटील, दीपाली भावसार, शितल राठी.