जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गावर रात्री अपघात झाला असून यात तरसोद येथील ग्रामस्थाचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रीय महामार्गा हा मृत्यूचा सापळा बनला असून विशेष करून गौरव हॉटेलपासून ते चौपदरीकरण झालेल्या हायवेपर्यंतचा रस्ता हा खूप अरूंद असल्याने यावर कायम लहानमोठे अपघात होत असतात. याच प्रकारे रात्री एका मोटारसायकलस्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहे.
तरसोद येथील रामचंद्र चिंधू कुंभार हे रेमंड कंपनीत कामाला असून ते रात्री साडेदहाच्या सुमारास ड्युटीवर जात होते. महामार्गावरील चांडक हॉस्पीटलच्या परिसरात ते एका ट्रकच्या मागील चाकात असल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.