जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा नूतन मराठा महाविद्यालय, जळगावच्या वतीने आज काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादयांकडून भारतीय जवानांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा महाविद्यालयात घोषणा व गेटमिटिंग घेऊन निषेध करण्यात आला.
यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘दहशतवाद हो बरबाद’, ‘’पाकिस्तान मुर्दाबा’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अभाविप प्रदेश सहमंत्री सिध्देश्वर लटपटे, नगर सहमंत्री सोहम पाटील, महाविद्यालय अध्यक्ष शुभम नाईक व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.