Home Cities जळगाव अभिषेक पाटील यांचा राष्ट्रवादी महानगराध्यक्षपदाचा राजीनामा

अभिषेक पाटील यांचा राष्ट्रवादी महानगराध्यक्षपदाचा राजीनामा

0
28

जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या महानगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

काही महिन्यांपासून जिल्हा राष्ट्रवादीत खांदेपालट होण्याची चर्चा सुरू आहे. यात पक्षाच्या महानगराध्यक्षपदी एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक अशोक लाडवंजारी यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा देखील सुरू होती. या संदर्भात गेल्या महिन्यात मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील नेत्यांच्या झालेल्या बैठकीत वादळी चर्चा देखील झाली होती. असे असूनही अद्यापही महानगराध्यक्षपद बदलण्यात आले नव्हते.

यातच अभिषेक पाटील यांची काल पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे त्यांनी संतप्त होऊन आपल्याला महानगराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे अशा मागणीचे पत्र पाठविले असून हा एक प्रकारे त्यांचा राजीनामाच मानला जात आहे.


Protected Content

Play sound