जलदूत फाउंडेशन करणार धरणगावातील तेली तलावाचे खोलीकरण

f5015bf3 2597 4a05 9ac9 f990ce28eb6c

 

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील भीषण पाणीटंचाई  सध्या आपण सर्वांच्या चिंतेची बाब आहे. या समस्येची दाहकता कमी करण्याच्या हेतुने येणाऱ्या पावसाळ्याआधी आपल्या गावात काही ठोस काम करावे, या हेतूने काही तरुणांनी उद्यापासून (दि.१३) शहरातील तेली तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ करायचे ठरवले आहे.

 

शहरातील प.रा. विद्यालय व बालकवी ठोंबरे शाळेत सन २०००-०१ साली इ. १० वीत शिकलेल्या अन २०१३ पासून व्हाटसअॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असलेल्या धरणगावातील तसेच गावाबाहेर राहणाऱ्या काही तरुणांनी एकत्र येवून ‘जलदूत फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली आहे. जलदूत फाउंडेशन धरणगाव ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत नोंदणीकृत संस्था असून संस्थेचा नोंदणी क्र.UAM No. MH14D0021153असा आहे. सदर संस्था वृक्ष संवर्धन आणि पाणी संवर्धन या विषयात भरीव काम करणेसाठी स्थापन केली गेलेली आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्व माजी विद्यार्थी एकत्र येवून येणाऱ्या काळात परिसरात वृक्ष संवर्धन आणि पाणी संवर्धन या विषयात समाज उपयोगी विविध उपक्रम हाती घेवून काम करणार आहेत. शहरातील तेली तलावाचा गाळ काढण्याच्या कार्यक्रमास तहसीलदार मिलिंद कुलथे वं मुख्याधिकारी श्रीमती सपना वसावे उपस्थित राहणार आहे
त. या तलावाचा गाळ काढुन खोलीकरण झाल्यास चिंतामणी मोरयानगर परिसरात व सोनवद रस्त्यावर असलेल्या विहिरी व बोअरवेलचा पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे. सदर गाळ हा शेतकार्यांना देण्यात येणार असून खोलीकरणानंतर निघणारा मुरूम वापरून तलावाच्या डाव्या बाजूच्या भिंतीचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. सदर कामासाठी सन २०००-०१ साली इ.१० वीत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून मदतनिधी गोळा केला जात असून सामान्य नागरिकांना सदर कामासाठी आर्थिक मदत करायची असल्यास खालील बँक खात्यावर निधी वर्ग करावा किंवा जळगांव जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत जमा करावा, असे आवाहन जलदूत फाऊंडेशनने केले आहे. संस्थेचा बँक खाते क्रमांक असा आहे, जनता सहकारी बँक लि. शाखा धरणगांव,
चालू खाते क्र. -23021000341IFSC-JJSB0000021.

Add Comment

Protected Content