एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील हणमंतखेडेसिम येथिल विकास कार्यकारी सोसायटीत अध्यक्षपदी जयप्रकाश पाटील आणि उपाध्यक्ष सुरेश कोळी यांची बिनविरोध करण्यात आली.
सदर निवड प्रसंगी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक रजनी पाटील, हर्षाली पाटील, नगरसेवक अभिजीत पाटील, किशोर पाटील, नाना पाटील, भागवत पाटील, रवींद्र पाटील, माणिक पाथरवट, अर्जुन पाटील, पुंडलिक पाटील उपस्थित होते. सदर निवडणूक बिनविरोध करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हा सरचिटणीस अमित पाटील, प्रदीप पाटील, संजय पाटील यानी सहकार्य केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रवींद्र महाजन यांना सेक्रेटरी नाना पाटील आणि गुणवंत पाटील यांनी सहकार्य केले.