जळगाव प्रतिनिधी | श्री जैन युवा फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा २१ जुलै राेजी सुरभी लॉन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
या पदग्रहण सोहळ्यात श्री जैन युवा फाउंडेशनचे मावळते अध्यक्ष प्रितेश चोरडिया यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष दर्शन टाटीया यांना पदभार सोपला. तर सचिव रितेश छोरिया आणि कोषाध्यक्ष पियुष संघवी यांच्यासह सदस्यांनी पदभार घेतला. याप्रसंगी सकल जैन समाजाचे अध्यक्ष दलिचंद जैन, रतनलाल जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, अजय ललवाणी उपस्थित आदी उपस्थित होते.